ताज्या बातम्यामनोरंजन

Preity Zinta Birthday : प्रीती झिंटाचे ‘हे’ 5 गाजलेले चित्रपट

Happy Birthday Preity Zinta : गोरीपान, चुलबुली आणि गालावर खळी असलेली 90 च्या काळातील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रीती झिंटा (Preity Zinta). प्रीती आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1998 मध्ये प्रीती झिंटाने एक नव्हे तर तीन चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. सोल्जर चित्रपटामध्ये बॉबी देओलसोबत दिसली होती. हा तिचा मुख्य भूमिका असलेला पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. प्रीती झिंटाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या गाजलेल्या 5 चित्रपटांबद्दल बोलूयात.

क्या केहना (Kya Kehna)

MV5BMjQ1OTU4YmEtYmQxYi00YjJkLTg3OTMtYjM1ZDAxNjhjNDM0XkEyXkFqcGdeQXVyODE5NzE3OTE@. V1 FMjpg UX1000

2000 साली प्रदर्शित झालेला ‘क्या केहना’ हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला होता. प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांनी एकत्र काम केलेल्या अनेक चित्रपटांपैकी हा पहिलाच चित्रपट आहे.  हनी इराणी लिखीत आणि कुंदन शाह यांनी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. क्या कहना चित्रपटाने विवाहपूर्व गर्भधारणेचा मुद्दा आणि त्यावरील समाजाचा दृष्टिकोन हाताळला होता. प्रीती झिंटा ही एकटी किशोरवयीन आई म्हणून मध्यवर्ती भूमिकेत होती तर सैफ अली खान, चंद्रचूर सिंग, फरीदा जलाल आणि अनुपम खेर सहाय्यक भूमिकेत होते.

 दिल चाहता है (Dil Chahta Hai)

51Yl abLkCL 11zon

2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल चाहता है’ हा एक युथफूल चित्रपट आहे. फरहान अख्तर लिखित आणि दिग्दर्शित असा हा चित्रपट आहे. त्याची निर्मिती रितेश सिधवानी यांनी केली होती. हा चित्रपट तीन महाविद्यालयीन-ग्रॅज्युएट मित्रांच्या रोमँटिक आयुष्यात घडणार्‍या घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात हे तीन मित्र म्हणजे आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना हे आहेत. यात प्रिती झिंटा, मराठमोळी सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया यांच्याही भूमिका आहेत. 

कोई मिल गया (Koi… Mil Gaya)

मिल गया पोस्टर

2003 मधील ‘कोई मिल गया’ हा सायन्स फिक्शन चित्रपट आहे. राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत रेखा आणि प्रीती झिंटा यांच्या भूमिका आहेत. कोई… मिल गया या चित्रपटाची कथा रोहितभोवती फिरते (हृतिक रोशन) ज्याची शारिरीक वाढ तर झाली आहे पण मानसिकदृष्ट्या वाढ पुरेशी झाली नाहीये. रोहित त्याचे दिवंगत वडील संजय (राकेश रोशन) यांच्या संगणकासह एका अंतराळातल्या व्यक्तींशी संपर्क साधतो. जमिनीवर आलेल्या एका एलियनशी त्याची मैत्री झालेली दाखवली आहे. त्याचप्रमाणे प्रीती झिंटा आणि हृतिक रोशनची सुपर लव्हस्टोरी देखील यात दाखवली आहे.

कल हो ना हो (Kal Ho Naa Ho)

KAL HOI NA HOI

2003 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप हिट ठरलाय. निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्याची निर्मिती यश जोहर यांनी केली होती. या चित्रपटात जया बच्चन, शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्यासोबत सुषमा सेठ, रीमा लागू, लिलेट दुबे आणि डेलनाझ पॉल यांच्या भूमिका आहे. या चित्रपटात न्यू यॉर्क शहरात राहणाऱ्या नैना कॅथरीन कपूर या नैराश्याने ग्रासलेल्या तरुणीची कथा सांगितली आहे. या चित्रपटामध्ये प्रीतीने नैनाची भूमिका सकारली आहे.

सलाम नमस्ते (Salaam Namaste)

Salaam Namaste 629208423 large

2005 साली ‘सलाम नमस्ते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे तर, यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रिती झिंटा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात निक आणि अंबर या दोन मॉडर्न जोडीची गोष्ट दाखवली आहे. हे दोघे आपापली स्वप्ने जगत असतानाच एकमेकांसोबत लिव्ह इन मध्ये रहात असतात. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते लग्न् न करताच दोघांचा पालक होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवला आहे. विशेष म्हणजे हा ऑस्ट्रेलियात चित्रित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये