हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांवर दु:ख! भावनिक पोस्टमध्ये म्हणाला, ‘तू आज आमच्यात नाहीस, पण…’
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी गेल्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. कधी चित्रपटामुळे तर मालिकेमुळे चर्चेत राहणारा हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये हार्दिक जोशीने एका व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोबतच त्याने पोस्टमध्ये एक खास योगायोगही शेअर केला आहे. अनेकदा आपल्या व्यक्तीचं जीवनात नसणं मान्य करणे खूप कठीण असते. अशावेळी भावना शब्दात मांडून व्यक्त होणे अत्यंत गरजेचे असते.
हार्दिक जोशीची पोस्ट
“ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीये, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. ‘जाऊ बाई गावात’ हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय. कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की ४ डिसेंबरच्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो, तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्यासोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. मिस यू ज्योती. माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको.
https://www.instagram.com/p/C0D4vLBS6gq/?utm_source=ig_web_copy_link&igshid=NTYzOWQzNmJjMA==
हार्दिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘जाऊ बाई गावात’ या शोमधून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्लब ५२’ मध्ये हार्दिक जोशी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर हार्दिक जोशी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.