हार्दिक पांड्याच्या करिअरला ब्रेक? ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याला देखील मुकणार
नवी दिल्ली : (Hardik Pandya Career Break) सगळीकडेच वर्ल्डकप फायनलचे वारे वाहत आहेत, पण याचदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपनंतर भारताला नेहमीप्रमाणे मालिका खेळायच्या आहेत. पण विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला स्फोटक अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे पुढील किमान दोन महिने बाहेर राहणार आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात हार्दिक पांड्याला घोट्याला दुखापत झाली होती.
हार्दिक पांड्याने स्वतः गोलंदाजी केलेल्या चेंडूवर फिल्डिंग करताना त्याचा तोल गेला आणि त्याचा पाय मुरगळला. या धक्क्यामुळे तो घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत (IND vs AUS) खेळू शकणार नाही आणि आता इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेतील तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर ठेवले जाऊ शकते.
एक स्फोटक फलंदाज आणि गोलंदाजीचा महत्त्वाचा पर्याय अशी त्याची दुहेरी भूमिका लक्षात घेता हार्दिक पांड्या संघाबाहेर असणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. पांड्याच्या अनुपस्थितीचे महत्त्व त्याच्या मैदानातील वैयक्तिक योगदानाच्या पलीकडे आहे. त्याची स्फोटक फलंदाजीची शैली आणि चेंडूसह महत्त्वपूर्ण यश मिळवण्याची क्षमता त्याला संघाच्या रणनीतीतील एक प्रमुख खेळाडू बनवते.