क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

अखेर रोहितचा गेम झालाचं! हार्दिक मुंबईचा नवा किंग

Hardik Pandya MI Captain : अखेर हार्दिक पांड्या ज्या हेतूसाठी मुंबई इंडियन्स सोडून गेला अन् परत देखील आला तो हार्दिकचा हेतू पूर्ण झाला. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 चा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. तो आता रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे.

मुंबई इंडियन्सचा ग्लोबल मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने घोषणा करताना ही मुंबई इंडियन्सने एका रणनितीनुसार हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. मुंबई इंडियन्सला भविष्यासाठी तयार करायचं आहे असेही जयवर्धने म्हणाला.

जयवर्धनेने सांगितले की, ‘मुंबई इंडियन्सचं सुदैव आहे की त्या संघाला कायम दमदार नेतृत्व मिळालं आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग ते रिकी पाँटिंग अन् रोहितपर्यंत या सर्वांनी मुंबई इंडियन्सच्या यशात आपले योगदान दिले.’

‘आम्ही कायम भविष्यातील संघ तयार करण्याच्या दृष्टीकोणातून कार्यरत असतो. त्यामुळेच हाच दृष्टीकोण ठेवून आयपीएलच्या 2024 च्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल.’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये