ताज्या बातम्यामनोरंजन

हार्डी संधूचा लाईव्ह शोमध्ये महिलेकडून विनयभंग, गायकानं स्वत: केला खुलासा; म्हणाला, “तिने मिठी मारली अन्…”

Hardy Sandhu | प्रसिद्ध गायक हार्डी संधू (Hardy Sandhu) नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे. हार्डी संधूने त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तसंच आता हार्डी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्डी अनेकदा देश-विदेशात लाईव्ह परफॉर्मन्स शो करत असतो. तर आता अशाच एका लाईव्ह शोदरम्यान हार्डीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. याबाबत त्यानं स्वत: खुलासा केला आहे.

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत हार्डी संधूने धक्कादायक खुलासा केला आहे. हार्डी एका लग्नसमारंभात परफॉर्म करण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका 30 ते 45 वर्षांच्या महिलेकडून त्याचा विनयभंग करण्यात आला होता.

हार्डीनं सांगितलं की, मी परफॉर्म करत असताना एक 30 ते 45 वर्षांची महिला स्टेजवर येण्याचा आग्रह करत होती. पण मी तिला म्हटलं की जर तुला मी स्टेजवर बोलावलं तर इतर लोकंही तसंच करतील. पण ती ऐकत नव्हती त्यामुळे मी तिला स्टेजवर बोलवलं.

ती महिला स्टेजवर आल्यानंतर तिनं मला एका गाण्यावर नाचण्याची विनंती केली. मग मी म्हणालो ठीक आहे. मी तिच्यासोबत डान्स केल्यानंतर तिनं मला मिठी मारण्यास सांगितलं. त्यामुळे मी हो म्हटलो आणि तिनं मला मिठी मारली. त्यानंतर तिनं माझ्या कानाला गैरप्रकारे स्पर्श केला. असा विनयभंगाचा धक्कादायक अनुभव हार्डीनं शेअर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये