हॅरिस रौफने रचला लाजीरवाणा विक्रम! एवढा चोपला की शक्ती कपूरलाही टाकले मागे..
बंगळूर : (Harris Rauf embarrassing record) शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी विश्वचषक 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हे दोन्ही गोलंदाज विश्वचषक सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वात महागडे गोलंदाज ठरले. हरिस रौफने 85 धावा आणि शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 90 धावा दिल्या. यादरम्यान शाहीनला एकही विकेट मिळाली नाही तर हॅरिसला एक विकेट मिळाली.
दुर्दैवाचा फेरा म्हणजे, हॅरीस आणि शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानच्याच हसन अलीचा विक्रम मोडला. ज्याने 2019 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 10 षटकात 1 बळी घेत 84 धावा दिल्या होत्या. पण हसन अलीचा हा लाजिरवाणा विक्रम एकाच सामन्यात आधी हॅरिस रौफ आणि नंतर शाहीन शाह आफ्रिदीने मोडला.
याच विश्वचषकात हरिस रौफने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 10 षटकात 83 धावा दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्याने 3 विकेट्सही आपल्या नावावर केल्या होत्या. आज पाकिस्तानचा संघ एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. 2023 च्या विश्वचषकाचा 35 वा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.