“एका मोदीला मिस इंडीया हवी, दुसऱ्या मोदींना…”, उद्योगपती हर्ष गोएंका यांचं ट्विट व्हायरल!

मुंबई | Harsh Goenka’s Tweet Gone Viral – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन आणि माजी चेअरमन ललित मोदी हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली सोशल मीडियावर दिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि फरार उद्योगपती नीरव मोदी या तिघांची तुलना करत एक भन्नाट ट्वीट केलं आहे. तसंच त्यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे.
उद्योगपती हर्ष गोएंका हे सद्यस्थितीवरील मार्मिक ट्विट्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललित मोदी आणि सुष्मिता सेनप्रकरणी नुकतीच काही ट्विट्स केली होती, जी खूप व्हायरल झाली होती. तसंच आता देखील त्यांनी तीन मोदी वेगवेगळ्या कारणांसाठी हवेहवेसे असल्याचं सांगत आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा फोटो देखील वापरला आहे.
हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एका मोदींना इंडिया हवा आहे. दुसऱ्या मोदीला ‘मिस इंडिया’ हवी आहे आणि तिसरा मोदी इंडियात हवा आहे.” गोएंका यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे. आतापर्यंत या ट्विटला साडेपाच हजाराहून अधिक लाइक्स मिळाले असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.