आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपवासाची भगर ठरतेय आरोग्यासाठी वरदान

Health Benefits Of Bhagar : नाशिकचा कांदा, नाशिकची द्राक्ष, नाशिकची वाईन’ अशी सातासम्रुदापार नाशिक’ची ओळख पोहोचली असताना, त्यात आणखी भर पडली आहेत ती भगरी’ची. उपवास असेल तर साबुदाणा वा फलाहाराला पर्याय म्हणून क्वचितच खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला अलिकडे देशभरातूनच नव्हे तर परदेशातून मागणी वाढली आहे.

ती ही नाशिकच्याच भगरीला. भगवान जगन्नाथपुरी येथे कोट्यवधी भाविकांसाठी खीर केली जाते, तीही नाशिकच्याच भगरी’पासून. वरईपासून दाणेदार भगरीचे देशभरात सर्वाधिक उत्पादन नाशिकमध्ये होते. एरवी, श्रावण-नवरात्रोत्सवात तेजीत असणारी भगर आता बाराही महिने ग्राहकांना हवी असते. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, तिच्यातील असणारे आरोग्यदायी गुणधर्म.

श्रावण-नवरात्रोत्सवात भगरची मागणी असते. डॉक्‍टरांकडूनच साबुदाणा न खाण्याचा सल्ला दिला जातो. भगर पचनाला हलकी, नो कॅलिरिज, नो शुगर आहे. वजनही वाढत नाही. मधुमेही, हृदयरोग रुग्णांसह वजन कमी करण्यासाठीही आहारतज्ज्ञांकडून भगर खाण्याचाच सल्ला दिला जातो. भगरीची खिचडी, इडली, शिरा, खीरही करता येते.

मधुमेह, हृदयविकार असलेल्यासाठी भगर सर्वोत्तम आहार आहे. विशेषत: लठ्ठपणामुळे हृदयाचा विकार बळावतो. आहारात भगरीचा समावेश असेल तर वजनही कमी होते. जी जीवनसत्त्वे रुग्णाला आवश्‍यक आहे ती भगरीतून मिळतात. शिवाय ती ऑर्गेनिक असल्याने कोणतेही दुष्परिणामाची शक्‍यता नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये