ताज्या बातम्या

कमळाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे

Makhana : तलाव आणि पाणथळ जागेचे वैभवं म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर पटकन डोळ्यासमोर कमळ हे नाव येते. भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाणारे कमळ आपण फक्त देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठीच वापरतो. परंतु कमळाचे फूलचं नाही तर देठ, पान आणि बीदेखील अत्यंत उपयोगी आहे. कमळकाकडी किंवा कमळाचा देठ हे काश्मिरी, सिंधी, पंजाबी खाद्यसंस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तसेच मखाणा म्हणजे कमळाची बी हिचादेखील मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी उपवासाच्या पदार्थांमध्ये किंवा प्रसादामध्ये हे मखाणे दिले जातात.

मखानाची शेती

देशातील सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्रावर मखानाची लागवड केली जाते. मखाना शेतीचे उत्पादन एकट्या बिहारमध्ये 80 ते 90 टक्के घेण्यात येते. बिहारच्या मिथिलांचलमध्ये मखानाचे 70 टक्के उत्पादन होते. भारतातील हवामानाच्या प्रकारानुसार मखानाची लागवड सोपी मानली जाते. या पिकासाठी उबदार हवामान आणि मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक आहे. देशाच्या पूर्व भागातही याची लागवड काही प्रमाणात केली जाते. आसाम, मेघालयव्यतिरिक्त ओडिशामध्ये हे पीक लहान प्रमाणात घेतले जाते. उत्तर भारतात गोरखपूर आणि अलवर येथेही त्याची लागवड केली जाते. जंगलात हे जपान, कोरिया, बांगलादेश, चीन आणि रशियामध्ये देखील आढळते.

मखाना खाण्याचे फायदे

उच्च रक्तदाबापसून आराम

मखाना खाल्ल्याने केवळ रक्तदाबच संतुलित राहणार नाहीये तर उच्च रक्तदाबामुळे शरीराला होणारे अपाय सुद्धा रोखले जातात. कारण मखाना मध्ये मॅग्नीशियमचे प्रमाण जास्त असते. हे एक असे खनिज आहे जे रक्तदाबाला संतुलित ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणूनच रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांना मखाना हे एकप्रकारे वरदान ठरते.

थकवा दूर करते

ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते आणि त्यांना दिवसभर थकवा जाणवतो त्यांनी तर मखाना नक्कीच खायला हवा. मखाना मध्ये विपुल मात्रामध्ये लोह असते. जे कि रक्ताच्या कमतरतेला भरून काढते. ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्यांना तोंडाला चव देणारा पदार्थ खाण्यासोबत लोह देखील हवे असले त्यांनी आवर्जून मखाना खावा.

अँटीऑक्सीडेंटने संपन्न

 मखाना खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडेंट वाढते. अँटीऑक्सीडेंट हा शरीराला आवश्यक असणारा अति महत्त्वाचा घटक आहे. अँटीऑक्सीडेंट मुख्यत: आपल्या शरीराची त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करण्यास मदत करतात. त्यामुळे मखाना खाल्ल्याने शरीर अधिक बळकट व निरोगी राहते.

वजन कमी करण्यासाठी

मखाना हे एक असे स्नॅक्स आहे ज्यामध्ये कोरेलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. याशिवाय माखन हे ग्लुटेन फ्री असतात. यात प्रथिनांचे आणि कार्बोहायड्रेट्चे प्रमाण अधिक असते. जर मखाना योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये