हिवाळ्यात योग्य वेळी संत्रा खा.. अन् तंदुरुस्त रहा; जाणून घ्या ‘हे’ फायदे
Health Care : आरोग्यासाठी फायदेशीर असणारे संत्रा हे फळ जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक असलेले फळ आहे. संत्र्याचा ज्यूस हा आवर्जून प्यायला जातो. दिवसाची सुरूवात चांगली करण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. संत्रा हे फळ चवीला आंबट-गोड लागते. व्हिटॅमीन सी चा प्रमुख स्त्रोत म्हणून ही या फळाकडे पाहिले जाते. हिवाळ्यात हे फळ कोणत्या वेळी खावे? याबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे संत्रा कोणत्या वेळी खावे? आणि त्याचे फायदे कोणते? याबद्दल माहिती जाणून घेवू..
रिकाम्या पोटी खाणे टाळावे
संत्र्याचा ज्यूस किंवा संत्र्याचे फळ हे शक्यतो रिकाम्या पोटी खाणे टाळावे. सकाळी किंवा रात्री या फळाचे सेवन करू नये. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री हे फळ खाल्ले तर यातील अॅसिड रिफ्लॅक्स होण्याचा धोका असतो. त्यामुळे, हिवाळ्यात दुपारच्या वेळी संत्र्याचा ज्यूस प्यावा किंवा हे फळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. या फळामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पोटाच्या समस्या दूर होतात
संत्र्यामध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे फळ फायदेशीर आहे. कारण, हे फळ खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे फळ खाल्ल्याने पोटाच्या समस्या देखील दूर होतात आणि पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते.
स्किन हेल्दी राहते
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. हे व्हिटॅमीन सी आपली त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. संत्रा खाल्ल्याने त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. तसेच, स्किन फ्रेश आणि सुंदर दिसते. त्यामुळे, हिवाळ्यात निरोगी त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी संत्र्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.