आरोग्यमहाराष्ट्र

व्हिटॅमिन सी कमी आहे, मग चिंता नको ‘हे’ फळे आहेत मुख्य स्रोत

Health News : अनेकदा डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञांकडून ‘व्हिटॅमिन सी’चा उल्लेख सतत केला जातो. पण तुम्ही विचार केला आहे का? आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीची गरज का असते आणि व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी कोणते मुख्य स्त्रोत आहेत. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास शरीराला अनेक आजारांचा आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करून शरीराच्या समस्या दूर करणं शक्य होतं.

व्हिटॅमिन सी शरीरासाठी का गरजेचं?
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. हे हाडं, त्वचा आणि रक्त वाहिन्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. याचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता, हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, व्हिटॅमिन सी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतं. त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीही मदत करतं. डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

शरीराला व्हिटॅमिन सी पुरवण्यासाठी काय कराल?
फळं आणि भाज्या व्हिटॅमिन सीचा मुख्य स्त्रोत आहे. संत्री, लिंबू, ब्रॉकली, स्ट्रोबेरी, आवळा, पेरू, किवी यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. ICMRच्या गाइडलाइन्सनुसार, दररोज कमीत कमी मिलीग्राम व्हिटॅमिन सीचं सेवन करणं गरजेचं आहे. दरम्यान, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या लोकांसाठी हे प्रमाण बदलू शकतं. मानवी शरीरात व्हिटॅमिन सी तयार होत नाही, तसेच साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरंत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये