धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोगासमोर आज पुन्हा शिंदे-ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा आमने-सामने!
नवी दिल्ली : (Hearing of Election Commission on petitions of Shiv Sena and Shinde group) एकानाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाळीने शिवसेनेला (Shivsena) अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 56 वर्षाच्या राजकीय पक्षाला आपल्या अस्तित्त्वासाठी सामना करण्याची इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (Uddhav Thackeray) चिन्ह कुणाचे यावर १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) मागील सुनावणी पार पडली. मात्र दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर सुनावणी २० जानेवारी (Election Commission) रोजी पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, त्यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेना-शिंदे गट निवडणूक आयोगासमोर आमने-सामने येणार आहेत. शिवसेनेचे कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी आयोगासमोर जोरदार युक्तीवाद केला होता. त्यामुळे आता निकाल अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला आहे. आज होणाऱ्या सुनावणीत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे राज्यासह संपुर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.
मागील आयोगासमोरील सुनावणीनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली होती. “कोणत्याही पक्षाच्या राज्यघटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद केली जाते. कलम २९ (अ) नुसार, राजकीय पक्षाची नोंदणी करताना निवडणूक आयोगाकडे पक्षाची राज्यघटना द्यावी लागते. त्यामुळे सध्या निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे, ती उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेची घटना आहे. त्यानुसारच निवडणूक आयोगाकडून सगळा विचार केला जाईल,” अशी प्रतिक्रिया उल्हास बापट यांनी दिली.