ताज्या बातम्यामनोरंजन

राजकारणात प्रवेश करणार का? हेमंत ढोमे म्हणाला, “आपण एकटे जाऊन…”

मुंबई | Hemant Dhome – मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) ‘सनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हेमंतनं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करताना दिसतो. आता हेमंत ढोमेनं एका मुलाखतीत राजकारणावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

हेमंतला एका मुलाखतीत “राजकारणात प्रवेश करणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मला राजकारणात प्रवेश करायला नक्कीच आवडेल. कारण तो माझ्या आवडीचा विषय आहे. मात्र सध्या तसं वातावरण नाही. मी हे सगळं प्रचंड फाॅलो करतो. मला कोणतेही राजकीय प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं माझ्याकडे आहेत. पण आता तसं वातावरण आजूबाजूला आहे असं मला वाटत नाही. सगळं खूप नकारात्मक आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्कीच विचार करेन.”

पुढे तो म्हणाला, “आपण एकटं जाऊन सर्व यंत्रणेत बदल करू शकत नाही. मी आलो की सगळं साफ करून टाकेन हे बोलायला आणि ऐकायला चित्रपटातील डायलाॅगसारखं चांगंल वाटतं पण तसं होत नाही. अनेक गोष्टी या ठरलेल्या असतात त्यामुळे आता तरी मी हे करणार नाही.”

दरम्यान, ‘सनी’ हा सिनेमा आज (18 नोव्हेंबर) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका अभिनेता ललित प्रभाकरने साकारली आहे. तसंच अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये