मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा
Hemant Patil Resignation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पहिला राजीनामा (Resignation) देण्यात आला आहे. शिंदे गटाचे आणि हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेमंत पाटील यांच्याकडे मराठा समाजातील काही आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी गेले होते. त्यावेळी आंदोलकांनी हेमंत पाटलांकडे त्यांच्या राजीमान्याची मागणी केली. त्यानंतर कसलाही विचार न करत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावानं राजीनामा लिहून तो आंदोलकांना दिला.
हेमंत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसंच आता मराठा आंदोलकांनी राजीनामा द्या असं म्हणताच हेमंत पाटलांनी तात्काळ राजीनामा दिला. मराठा आरक्षणासाठी एखाद्या खासदारानं दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.
मराठा आंदोलकांनी हेमंत पाटलांचा ताफा हदगावमध्ये अडवला होता. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि मनोज जरांगेंच्या तब्येतीला काही झालं नाही पाहिजे असं आंदोलकांनी पाटलांनी सांगितले. त्यावेळी हेमंत पाटील म्हणाले की, मी स्वत: आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये उपोषणाला बसणार आहे.