ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा का महत्त्वाचा? वाचा सविस्तर!

मुंबई : (Shevsena mumbai Dasra melava) संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर मराठी भूमिपुत्रांचा मुद्दा घेऊन राज्यातील मराठी माणूस पेठून ऊठला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पहिला दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेबांनी 19 जून १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या स्थापनेनंतर या मेळाव्या पहिल्यांदा दसरा मेळाव्याबाबत राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

तीन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंसह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड करत आपणच शिवसेना असल्याचा केलेला दावा यामुळं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाणाची लढाई केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालंय. शिंदे गटाच्या नेत्यांनी आम्हीच शिवसेना असल्याचं सांगत पक्षावरच दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सध्या विधानसभेचे १५ आमदार, विधानपरिषदेतील आमदार, राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे ६ खासदार आहेत. एका बाजूला कोर्टातील लढाई पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई सुरु असतानाचं शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा असणारा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेत उद्धव ठाकरेंना शिवसेना आपलीच असल्याचं दाखवून देण्याची संधी आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत शिवसैनिक आणि महाराष्ट्रापुढं शिवसेना पक्ष आपल्यासोबत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल. त्यामुळेच पालिका परवानगी देण्यासाठी धजावताना दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये