
मुंबई – Jaspreet Bumrah hit Broad – भारत आणि इंग्लंडविरूद्धमधील (INSvsENG) पाचव्या कसोटीमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) अखेरच्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉडला कसोटीच्या इतिहासात सर्वाधिक धावा ठोकल्या. बुमराहने 84 व्या षटकात तब्बल 35 धावा काढल्या आहेत. बुमराहने केलेली ही फटकेबाजी विक्रम ठरली.
कसोटीमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम ब्रायन लारा यांच्या नावावर होता. लारा यांनी आपल्या 2003 साली पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 28 धावा काढल्या होत्या. ब्रॉडच्या षटकातील अखेरचा चेंडू सोडला तर बुमराहने सर्व चेडूं सीमारेषेपलीकडे टोलावले आहेत.
दरम्यान, माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने बुमराहच्या या फटकेबाजीवर खास ट्विट केलं आहे. हा युवराज आहे बुमराह, 2007 ची आठवण झाल्याचं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.