वाढत्या पर्यटकांमुळे हिमालय असुरक्षित

पर्यावरणाची काळजी कोण घेणार?
हिमालयाच्या कुशीत अनेक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळं आहेत. हिमालयातलं सौंदर्य देशभरातल्या पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतं; परंतु वाढते पर्यटक आणि त्यांनी निर्माण केलेला कचरा हिमालयाला असुरक्षित बनवत आहे. वारंवार होणार्या भूस्खलनालाही पर्यटकांची वाढती संख्याच कारणीभूत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही समस्या किती गंभीर आहे? ती कशी दूर करता येणार?
हिमालयाच्या दुर्गम भागात अमरनाथ यात्रेचं आयोजन भारताची क्षमता आणि इच्छा दर्शवतं. या धोकादायक भूप्रदेशाची जाणीव यात्रेकरूंना करून देण्यासाठी आणि त्या उंचीवर चढण्यासाठी चांगल्या आरोग्याची गरज असूनही यात्रेकरूंची संख्या दर वर्षी वाढत आहे. यातून यात्रा सुरक्षित करण्यासाठी सरकारचे वाढते प्रयत्न तर दिसून येतातच; शिवाय सरकारकडून पुरवल्या जाणार्या सुविधांबाबत लोकांचा विश्वासही दिसून येतो; पण यात्रेकरूंच्या प्रचअंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर हिमालय असुरक्षित बनला आहे का, असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांना पडला आहे.
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरामुळे किमान १६ जणांचा मृत्यू झाला तर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या १५ हजार यात्रेकरूंना सखल भागात असलेल्या पंजतरणी छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी भागात पर्यटक आले नव्हते. पर्यटन व्यवसाय अडचणीत आला होता. कोरोनातून सावरत असताना आता पर्यटक दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढत आहेत, असं एकंदर चित्र आहे. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी झालेल्या भाविकांच्या संख्येवरून आणि हिमाचल प्रदेशातल्या हॉटेलमधल्या रूम्सच्या आरक्षणावरून हे स्पष्ट झालं आहे.
तीन हजार ८८० मीटर उंचीवर वसलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेचा ४३ दिवसांचा प्रवास ३० जूनपासून दोन मार्गांनी सुरू झाला. ४८ किलोमीटरचा पहिला मार्ग दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये आहे, तर दुसरा सुमा ३४ किलोमीटरचा मार्ग मध्य काश्मीरमधल्या गंदरबलमधल्या बालटालमार्गे जातो. केंद्र सरकारने सांगितलं की यंदाची अमरनाथ यात्रा ऐतिहासिक आणि आतापर्यंतची सर्वात मोठी असेल.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद यांनी सांगितलं की यंदा सुमा ७-८ लाख यात्रेकरू भेट देतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी, केंद्र सरकारने यात्रामार्गांवर पोलिस आणि लष्कराव्यतिरिक्त केंद्रीय राखीव दलाचे आणि इतर केंद्रीय दलांचे ४० हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत. यादरम्यान यूएव्हीद्वा पाळत ठेवण्याबरोबरच, ड्रोन हल्ला रोखण्यासाठी काउंटर-ड्रोन यंत्रणादेखील तैनात केली जाते. २०१२ च्या सरकारी आकडेवारीनुसार, २००९ मध्ये अमरनाथ यात्रींची संख्या सुमा चार लाख होती. २०१२ मध्ये वाढून ती ६.२१ लाख झाली.
तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत यात्रेदरम्यान होणारी जीवितहानी वाढत असल्याचं सांगितलं होतं. २००९ मध्ये मृत्यूंची संख्या ४५ होती. २०१० मध्ये ती ७७ झाली तर २०११ मध्ये १०६ पर्यंत वाढली; मात्र २०१२ मध्ये ही संख्या ९३ पर्यंत खाली आली. तरीही २००९ मध्ये मृतांची संख्या दुप्पट होती. २०१३ मध्ये अमरनाथला जाणार्या रस्त्यावर २१४ अधिक लोकांचा मृत्यू झाला होता; पण त्यानंतर असे मृत्यू कमी होत गेले आणि संख्या २५ ते ५० च्यादरम्यान होती. सर्वात वाईट दुर्घटना १९९६ मध्ये घडली.
तेव्हा खराब हवामानामुळे २५० हून अधिक यात्रेकरू मरण पावले. या दुर्घटनेनंतर सरकारने एक समिती स्थापन केली. ३० दिवसांमध्ये अमरनाथला भेट देणार्या एकूण लोकांची संख्या एक लाखांपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली होती. दररोज ३,४०० पेक्षा जास्त भाविकांना जाण्याची परवानगी नाही; परंतु त्यापेक्षा जास्त भाविक अमरनाथ यात्रेला येतात. त्यामुळे दुर्घटना वाढतात.
जम्मू-काश्मीरमधल्या अशांततेमुळे जुलै २०१६ मध्ये अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र चारधाम यात्रेसाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे. यंदा बद्रीनाथ यात्रेला जाणार्यांची संख्या खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते यात्रेकरूंची जास्त संख्या हे मृत्यूच्या मोठ्या संख्येमागील मुख्य कारण असू शकतं. उत्तराखंड पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार दररोज सुमा ५५ ते ५८ हजार यात्रेकरू चारधाम तीर्थक्षेत्री पोहोचत आहेत. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत सुमा १५ हजारने जास्त आहे. चारधाम यात्रेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट दिली जाते. ही ठिकाणं हिमालयात आहेत. या प्रवासामुळे प्लास्टिक आणि इतर कचरा साचत असल्याची चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
(पूर्वार्ध)