ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पेट्रोल, डिझेल संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : (Shinde government’s big decision petrol, diesel Rate) महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पदाची शपथ घेतल्यापासून अनेक घोषणांचा पाऊस पाडत आहेत. गुरुवार दि. १४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आणखी काही मोठ्या घोषणा शिंदे सरकारनं केल्या आहेत. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, त्याला काही प्रमाणात आळा घालण्याचं काम शिंदे यांनी केले आहे. रोज वाढणाऱ्या जिवनावश्यक वस्तूंच्या भावामुळं सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती.

दरम्यान, या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय म्हणजे पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय होय. यामुळं राज्यातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे आधार देण्याच काम केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. राज्यातील नागरिक पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करीत होते त्याला कुठं तरी यश मिळताना दिसत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपुर्ण निर्णय

१) पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय २) राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार ३) केंद्र पुरस्कृत अमृत अभियान राज्यात राबविणार ४) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार ५) राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार.

६) अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार ७) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा. ८) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.९) आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार असल्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये