क्रीडादेश - विदेश

पहिल्यांदाच भारताने जिंकला थॉमस कप; बॅडमिंटन मध्ये तिरंगा फडकला

नवी दिल्ली : थॉमस कप २०२२ च्या फायनल मध्ये भारताने इतिहास रचला आहे. सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून थॉमस कप 2022 चे विजेतेपद मिळवले आहे.

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने एंथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुस-या सामन्यात सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसरा सामना एकेरीचा होता, त्यात किदांबी श्रीकांत याने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव केला.

यावेळी भारताने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या संघांना पराभूत करून भारतीय संघाने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास खूप मजबूत होता. नंतर अंतिम फेरीत 14 वेळा विक्रमी विजेत्या इंडोनेशियाला पराभूत करून भारताने इतिहास रचला आहे.

किदांबी श्रीकांत आणि जोनाथन क्रिस्टी यांच्यात तिसरा एकेरी सामना खेळला गेला होता. किदांबीने सुरुवातीपासूनच सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखले. किंदाबीने क्रिस्टीचा 21-15, 23-21असा सरळ गेममध्ये पराभव केला. किदांबीच्या विजयाने टीम इंडियाने अंतिम फेरीत 3-0 अशी आघाडी घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये