पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने इतिहास रचला असून तिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.रमिता जिंदाल २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धेक ठरली आहे. २० वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६३१.५ गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत १०० पेक्षा जास्त गुण मिळवले.
याव्यतिरिक्त, नेमबाज मनू भाकरकडून देशाला सुवर्णपदकाची आशा आहे. शुटिंग, रोईंग , टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, टेनिस, बॉक्सिंग, आर्चरी या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
भारताच्या खेळाडूंचे सामने पुढीलप्रमाणे-
२.४५ वाजता,नेमबाजी – संदीप सिंग आणि अर्जुन बबुता हे १० मीटर एअर रायफल पात्रता फेरीत सहभागी
३.00 वाजता टेबल टेनिस -पुरुष एकेरी टेबल टेनिसमध्ये राऊंड ऑफ ६४ मध्ये शरथ कमल भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
३.३० वाजता नेमबाजी -भारताला मनू भाकरकडून पदकाची आशा आहे. १० मीटर एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत मनू भाकर खेळेल.
३.३० वाजता टेनिस =पुरुष एकेरी पहिल्या फेरीत भारताचा सुमित नागल सहभागी होईल.
३.५० वाजता, बॉक्सिंग -महिला ५० किलो वजनी गटात राऊंड ऑफ ३२ मध्ये निखत झरीन भारतातर्फे सहभागी होईल.
४.३० वाजता, टेबल टेनिस -राऊंड ऑफ ६४ टेबल टेनिसमध्ये मानिका बात्रा ही भारतातर्फे खेळेल.
५.४५ वाजता तिरंदाजी-भारताला महिला तिरंदाजांकडून देखील पदकाची आशा आहे. उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत खेळतील.
७.४५ वाजता, तिरंदाजी -दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत यांना उपांत्यपूर्वी फेरीत यश मिळाल्यास उपांत्य फेरीचा सामना सायंकाळी ७.४५ वाजता होईल.