क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

इतिहास रचला! ‘हॉकी महिला ज्युनियर आशिया चषक’ स्पर्धेत पोरींनी प्रथमच पटकावले विजेतेपद

Hockey Junior Asia Cup : भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. या संघाने ज्युनियर महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारताने प्रथमच या स्पर्धेवर नाव कोरले आहे.

अंतिम फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाने सर्वाधिक 4 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा 2021 मध्येच होणार होती पण कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली.

हॉकी इंडियाने घोषित केले की खेळाडूंना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळेल. तसेच सहाय्यक कर्मचार्‍यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये