पुण्यातील वाघोली येथे स्कूल बसचा भीषण अपघात; अनेक विद्यार्थी जखमी
पुणे | Pune News : पुण्यातील (Pune) वाघोली (Wagholi) येथे एका स्कूल बसचा भीषण अपघात (School Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर जोरात आदळल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या या विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाघोलीतील रायझिंग स्टार स्कूलच्या बसच्या ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण अचानक सुटल्यानं हा अपघात घडला आहे. बस जोरात झाडावर आदळल्यामुळे अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातानंतर वाघोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसंच या अपघातामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप करत याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पोलीस याचा तपास करत आहेत.