पुणेराष्ट्रसंचार कनेक्ट

हॉटेल कलाश्री ग्राहकांच्या पसंतीस उतरेल : सरपंच संजीवनी थिगळे

राजगुरूनगर : राजगुरूनगर परिसरात विविध व्यवसायांच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने प्रामाणिक व दर्जेदार ब्रँड बनलेल्या कलाश्री ग्रुपने नव्याने हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. हॉटेल कलाश्रीद्वारे व्हेज नॉनव्हेजच्या खवैयांसाठी लज्जतदार पदार्थांचे भव्य व निवांतपणा देणारे दालन ग्राहकांच्या पसंतीस पडेल, अशी खात्री सातकरस्थळच्या लोकनियुक्त सरपंच संजीवनी थिगळे यांनी व्यक्त केली.

भीमाशंकर- राजगुरूनगर राष्ट्रीय मार्गावर, शहरालगत सातकरस्थळ पश्चिम येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. ५) कलाश्री हॉटेलचे उद्घाटन सरपंच थिगळे यांच्या हस्ते झाले.यावेळी शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. खेडचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव, सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण, आशिष थिगळे, विकास थिगळे, तिन्हेवाडीचे सदस्य संतोष पाचारणे, जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब देवदरे, दिलीप पाचारणे, पोलीस अधिकारी घोलप, पांडुरंग सांडभोर, भाऊसाहेब आरुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राजगुरूनगर बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, धनंजय कहाणे, समीर आहेर, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक रंगनाथ आरुडे, दत्तात्रय शिवले यांनी शुभेच्छा दिल्या.

श्री ग्रुपचे संचालक बाळा उर्फ ज्ञानेश्वर पाचारणे,अनिकेत पाचारणे यांनी सर्वांचे स्वागत केले. तिन्हेवाडीच्या माजी सरपंच कविता पाचारणे यांनी सर्वांचे आभार मानले.कलाश्री हॉटेलमध्ये स्वच्छ व ताजे पदार्थ मिळणार आहेत.

फ्रेश व लज्जतदार पंजाबी डिशेस, मासवडी थाळी, चायनिज, गावरान चिकन थाळी,मटण थाळी,मच्छी थाळी,चिकन तंदूरी,दम बिर्याणी असे विविध पदार्थ मिळणार आहेत.हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

घरगुती पद्धतीने व चुलीवर बनवलेले शुद्ध शाकाहारी व अस्सल मांसाहारी जेवण येथे मिळणार आहे.व्हेज साठी स्वतंत्र किचन व्यवस्था करण्यात आली आहे.हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये