आरोग्यताज्या बातम्या

ख्रिसमस आणि न्यू ईयरपुर्वी कोरोनाबाबत WHO चा इशारा; जारी केली अ‍ॅडव्हायजरी

Coronavirus New Subvariant : कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट (New Subvariant of Corona) सध्या जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) म्हणजेच, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) याबाबत एक निवेदन जारी केलं आहे आणि कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट JN.1 हे ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्गीकरण केलं आहे. JN.1 पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या, BA.2.86 चा भाग म्हणून वर्गीकृत करण्यात आला होता. मात्र आता हिवाळा सुरू झाल्यानं हा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. परंतु JN.1 आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्या अस्तित्वात असलेली व्हॅक्सिन यापासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

WHO सातत्याने या व्हेरिएंटच्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. त्याचसोबत WHO ने लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, लोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच शक्यतोवर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा. आरोग्य कर्मचारी आणि मेडिकल संबंधित लोकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करावे. पीपीई किट घालून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करा. व्हेंटिलेटरची सुविधा गरजेनुसार उपलब्ध करून ठेवा असं सांगण्यात आले आहे.

अमेरिकेत ८ डिसेंबरला आढळला पहिला रुग्ण

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एन्ड प्रिवेंशननं या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ८ डिसेंबरपर्यंत अमेरिकेत वाढलेल्या १५ ते २९ टक्के कोरोना रुग्णांसाठी व्हेरिएंट जेएन १ जबाबदार आहे. जेएन १ पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात आढळला. मागील आठवड्यात चीनमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटचे ७ रुग्ण सापडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये