व्यक्तिमत्त्व खुलविणारा परफ्युम कसा निवडाल?
How To Pick Good Perfume : स्टायलिश कपडे, ट्रेंडी हेअर स्टाईल याच्या जोडीलाच अतिशय परफेक्ट परम्युम असेल तर विचारायलाच नको.सुगंधाची पेरणी करणारे परफ्युम प्रत्येकालाच आवडतात. उत्तम परफ्युम सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो,चटकन मूड चांगला करतो. योग्य परफ्युम कसा निवडावा याबद्दल…
पुरेशी माहिती घ्या
परफ्युमसंदर्भात पुरेशी माहिती असणे, हा कळीचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम, अत्तर यांबद्दल वाचन करा, माहिती मिळवा. परफ्युममधील घटक, तुमचा कम्फर्ट याविषयी खोलात जाऊन अभ्यास करा. यातून योग्य परफ्युमची निवड सोपीहोते.
विविध सुगंधांवर लक्ष द्या
प्रत्येक परफ्युममध्ये सुगंधाचे विविध थर असतात. त्याकडे बारकाईने लक्ष द्या. काही फुलांचा गंध असलेले, काही फळांचा गंध असलेले, तर काही थोडेसे उग्र गंध असलेले असतात. यातून योग्य मिश्रण साधणे महत्त्वाचे असते.
सॅम्पल परफ्युमचा वापर करा
हाताच्या मनगटावर सॅम्पलचा वापर करा. मनगटावरील त्वचा उबदार असते आणि तेथे परफ्युमचा सुगंध अचूक लक्षात येतो. सॅम्पलचा वापर करून परफ्युम ओळखणे, हीच योग्य पद्धत असते. त्यामुळे दुकानात जाऊन सरळ एखाद्या ब्रॅंडचा परफ्युम विकत घेण्यापेक्षा तुम्हाला योग्य ठरणारा परफ्युम निवडून मगच खरेदी करा.
तुमच्या त्वचेचा पोत पाहा
परफ्युमचा आणि त्वचेचा थेट संबंध असतो. परफ्युमचा वापर केल्यावर येणारा सुगंध कसा असणार, हे त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. जर त्वचा अतिशय संवेदनशील असेल, तर उग्र परफ्युमचा वापर करू नका.