पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील शेकडो मुस्लिम बांधवांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..!

विधानसभेचे पडघम येत्या काही दिवसात वाजायला सुरुवात होईल यातच पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवत पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना भवन, दादर मुंबई येथे प्रवेश केला. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थित हे प्रवेश झाले. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते.


पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या कार्यकाळात शिवसेनेने जोरदार इंनकमिंग सुरू झाली. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजप युवा मोर्चाचे चेतन पवार, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, भाजपचे एकनाथ पवार यांचा समावेश आहे.त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणखी वाढल्याची पाहायला मिळत आहे.


उद्धव ठाकरे यांचे कार्य आणि त्यांची असलेली सर्वसमावेशक भूमिका यावर आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कार्यरत राहून धेय्यधोरणे पोचवण्यासाठी काम करणार असल्याच्या भावना व्यक्त
केल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये