“अजित पवारांना भाजपमध्ये जाण्यासाठी मी परवानगी दिली…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई | Sharad Pawar – अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) गेल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. तर अजित पवार भाजपमध्ये जाण्यामागे शरद पवारांचाच (Sharad Pawar) हात असल्याचं म्हटलं जातं. यावर आता स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
अजित पवारांना भाजपमध्ये जाण्यासाठी मी परवानगी दिली नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार भाजमध्ये का गेले? याबाबत सांगताना शरद पवार म्हणाले की, त्यांनी आणि त्यांच्या गटानं तपास यंत्रणांच्या भीतीमुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या गटानं भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याकडे 6-7 सहकारी आले होते. आम्ही सरकारला पाठिंबा दिला नाही तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल, असं ते मला म्हणाले. तसंच आमच्यासमोर दोनच पर्याय आहे एकतर जेलमध्ये जाणं किंवा भाजपमध्ये जाणं, असंही ते मला म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.