‘माझ्यामध्ये हा चित्रपट पाहण्याची हिंमत नाही कारण…’; सोनू निगमने ‘द कश्मीर फाईल्सवर’ केलं भाष्य

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने बाॅक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली आहे. तसंच हा चित्रपट चांगलाच चर्चेत असून या चित्रपटावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये नुकतंच गायक सोनू निगमनं एका मुलाखतीमध्ये या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यानं हा चित्रपट न पाहिल्याच कारणं सांगितलं आहे.
मुलाखतीमध्ये सोनूला विचारण्यात आलं की, ‘त्याने हा (द कश्मीर फाईल्स) चित्रपट अजून का पाहिला नाही?’ तेव्हा या प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं, ‘माझ्यामध्ये हा चित्रपट पाहण्याची हिंमत नाही कारण मी संवेदनशील आहे. माझ्या संवेदना केवळ काश्मिरी पंडितांबद्दलच नाही तर त्या सर्व समुदायांबद्दल आहे ज्यांनी त्रास सहन केला आहे.’
पुढे सोनू म्हणाला, ‘हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा मी दुबईमध्ये होतो. हा चित्रपट दुबईमध्ये रिलीज झाला नाही. पण भारतात परत आल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची हिंमत झाली नाही.’