‘माझ्या मुलांना सांगाव लागतं की माझा चित्रपट प्रदर्शित झाला आहे…’ – अजय देवगण

मुंबई : बॅालिवूड अभिनेता अजय देवगण लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तसंच अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रन वे 34’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. रन वे 34 मध्ये एका वैमानिकाची कथा मांडण्यात आली असून तो स्वताचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचवतो, असं या चित्रपटामध्ये मांडण्यात आलं आहे. यादरम्यान अजयनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, जेव्हा आपला एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्याचे प्रमोशन बाहेर करणे हे तुलनेनं सोपं असतं. मात्र जेव्हा तो कुटूंबियांना पहा म्हणून सांगणं अवघड असल्याचं अजयने सांगितलं आहे.
अजयनं यावेळी त्याच्या कुटूंबियांशी संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, मला माझ्या मुलांना सांगावं लागतं की, माझा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि तुम्ही तो पाहा. मग ते विचार करतात. आणि मला सांगतात. अशी भन्नाट प्रतिक्रिया अजयनं दिली आहे. तसंच अजयचा रन वे 34 हा चित्रपट त्याची पत्नी काजोलनं प्रोड्युस केला आहे.