“…तर मी 25 तारखेला आत्महत्या करणार”, शाहरूखच्या चाहत्यानं दिली धमकी; व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई | Pathaan – सध्या बाॅलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ची (Pthaan) सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तरीही सगळीकडे याचं ऍडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तसंच शाहरुखचे (Shah Rukh Khan) चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
शाहरुखचे (Shah Rukh Khan) चाहते त्याच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. अशातच त्याच्या एका चाहत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखला धमकी दिली आहे. येत्या 25 जानेवारीला मी आत्महत्या करणार असल्याचं शाहरुखच्या चाहत्यानं म्हटलं आहे.
शाहरुखच्या या चाहत्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतोय की, जर 25 तारखेला ‘पठाण’चा पहिला शो मला बघायला मिळाला नाही तर मी जीव देणार आहे. बाजूला दिसणाऱ्या तलावात मी उडी मारून आत्महत्या करणार आहे. माझ्याकडे पैशांची समस्या आहे आणि मला कुणीही ‘पठाण’च्या पहिल्या शोचं तिकीट काढून देण्यास मदत करत नाहीये, म्हणूनच मी 25 जानेवारीला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.