रणबीरच्या नावाच्या टॅटूबाबत दीपिका स्पष्टच बोलली; म्हणाली, “मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप…”

मुंबई | Deepika Padukone – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) नेहमीच चर्चेत असते. तसंच ती तिच्या लव्ह लाईफमुळेही बऱ्याचदा चर्चेत आली आहे. दीपिका आणि रणबीर कपूरचं (Ranbir Kapoor) अफेअर चांगलंच गाजलं होतं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सगळीकडेच सुरू होत्या. ते लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. तसंच दीपिकानं रणबीरच्या नावाचा टॅटूही तिच्या मानेवर काढला होता. पण अचानक या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता दीपिकानं रणवीर सिंगशी आणि रणबीरनं आलिय भट्टशी लग्न केलं आहे.
जरी रणबीर आणि दीपिका एकमेकांपासून लांब गेले असले तरी, दीपिकानं काढलेल्या रणबीरच्या नावाच्या टॅटूची आजही चर्चा होताना दिसते. तिनं तिच्या मानेवर RK असं लिहिलं होतं. तसंच एकदा तिनं ‘काॅफी विथ करण’च्या तिसऱ्या पर्वात हजेरी लावली होती. त्यावेळी दीपिकाला या टॅटूबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा तिनं याबाबत खुलासा केला होता.
“ही अशी गोष्ट आहे, जी मला त्यावेळी योग्य वाटली होती. मला याचा कधीच पश्चाताप झाला नाही. तसंच मी तो टॅटू काढून टाकण्याचा कधीच विचार केला नाही. मला माहितीये मीडिया सतत म्हणते मी तो टॅटू काढला आहे. पण तो टॅटू तसाच आहे. माझा तो टॅटू हटवण्याबाबत कोणताही प्लॅन नाहीये”, असं दीपिकानं सांगितलं होतं.