टीम इंडिया मोठा धक्का! ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं हाॅस्पीटलमध्ये भरती
ICC ODI WORLD CUP 2023 : भारतीय संघाचा सलामीवीर युवा फंलदाज शुभमन गिल याला डेंग्यूच्या उपचारासाठी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शुभमन गिलच्या या बातमीमुळे टीम इंडियाची डोकदुखी वाढली असून ओपनिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही फक्त टीम इंडियाची डोकेदुखी नसून, भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी देखील धक्का मानला जात आहे.
डेंग्यूच्या साथीमुळे भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे भारतापुढे ओपनिंगचा प्रश्न निर्माण झाला होता. गिल आगामी सामन्यांत संघात सामील होईल अशी अपेक्षा असतानाच हि बातमी समोर आली आहे. त्याला पुर्णपणे बरं होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यातही गिल खेळू शकणार नाही. त्यामुळे या आघाडीच्या फलंदाजाची उणिव कोण भरुन काढणार? अन् टीम इंडियाचा ओपनिंगचा प्रश्न कसा मिटणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने भारतीय क्रिकेटप्रेमींना पडले आहेत.