क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये ‘या’ कारणामुळे पराभव? ICC च्या मोठा खुलासा

ICC World Cup 2023, IND vs AUS : 19 नोव्हेंबर 2023 ला प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेले आघात आजही ताजे आहेत. तो दिवस देशातील कोणतीच व्यक्ती, कधीच विसरू शकणार नाही. याच दिवशी गुजरातमधील (Gujarat) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात वर्ल्डकप 2023 (ICC World Cup) चा अंतिम सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाच वर्ल्डकप (World Cup 2023) ट्रॉफी उंचावणार हे प्रत्येक भारतीयानं मानत अगदी पक्क केलेलं, पण चतुर कांगारुंनी मोठ्या शिताफिनं टीम इंडियाला नमवलं आणि देशातील 140 कोटी लोकांचा हिरमोड झाला. आज त्या घटनेला तब्बल 19 दिवस उलटलेत. याच अंतिम सामन्याबाबत एक मोठा रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया अंतिम सामन्यात पराभूत होण्याचं कारण सांगण्यात आलं आहे.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवण्यात आला. ज्या खेळपट्टीवर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळला होता, त्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) ‘सरासरी’ रेटिंग दिलं आहे. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या पराभवाचं कारण सांगताना खेळपट्टीला जबाबदार धरलं होतं.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, आयसीसीनं पाच विश्वचषक सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिलं आहे, ज्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचाही समावेश आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं सर्वात आधी प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 240 धावा केल्या. टीम इंडियाचं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं 43 षटकांत लक्ष्य गाठलं आणि विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये