क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

स्पर्धेत पाकिस्तानची पोलखोल, शाहीन आफ्रीदीबाबत इतकी मोठी गोष्ट लपवली

ICC World Cup 2023 Pakistan Squad : आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात आली आहे. पुढचे 46 दिवस दहा संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ तब्बल सात वर्षांनी भारतात आलाय. हैदराबादमध्ये पाकिस्तान संघाचं (Pakistan Team) जोरदार स्वागत करण्यात आलं. चाहत्यांचं प्रेम पाहून आपण परक्या देशात आहोत असं वाटतच नसल्याचं बाबर आझमने (Babar Azam) म्हटलंय. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना नेदरलँडशी (Pakistan vs Netherland) रंगणार आहे. पाकिस्तानसाठी हा सोपा पेपर असला तरी स्पर्धेपूर्वीच्या दोन सराव सामन्यात पाकिस्तानला पराभव सहन करावा लागला होता.

सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली होती. पाकिस्तानी गोलंदाजी जगात भारी मानली जाते. पण सराव सामन्यात गोलंदाजांचा जराही प्रभाव पाहिला मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजीला झालं तरी काय असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. यावरुनच पाकिस्तान संघाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानाच क्रीडा पत्रकार जैनब अब्बास आणि माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांच्या बोलण्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिती पूर्णपणे फिट नसल्याचं समोर आलं आहे.

जैनब अब्बास आणि मोहम्मद आमिर यांच्या बोलण्यात झालेल्या खुलाशात शाहीन आफ्रिदीच्या डाव्या हाताचं बोट सुजलं आहे. महत्वाचं म्हणजे याच बोटाने तो चेंडू स्विग करतो. याचाच अर्थ शाहीन आफ्रिदी त्याच्या लौकिकाला साजेशी बॉलिंग करु शकत नाहीए. एशिया कप 2023 स्पर्धेत शाहीनच्या बोटाला दुखापत झाली होती. फिल्डिंग करताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो सामना सोडून मैदानातून बाहेर पडला होता. या दुखापतीतून शाहीन आफ्रीदी अद्याप बरा झालेला नाही. अशा परिस्थितीतही त्याला विश्वचषक स्पर्धसाठीच्या संघात जागा देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये