क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर ‘हा’ खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन

हार्दिक पांड्याचं होमग्राऊंड

अहमदाबाद : (ICC World Cup India vs Pakistan) जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेल्या विश्वचषकातील हायव्होल्टेज सामन्याला आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित अन् बहुचर्चित भारत-पाकिस्तान या कट्टर विरोधक असलेल्या संघात उद्या सामना रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांमध्ये हायटेन्शन असतं. तसंच दोन्ही संघांवरही जिंकण्याचं तितकंच दडपण असतं. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोनही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी रोहितसेना आणि बाबरसेना सज्ज झालेत. तर दुसरीकडे विजयी रथ रोखण्यात कोणाला यश येतं हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत-पाकिस्तानदरम्याचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. मोदी स्टेडिअम हे हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) होम ग्राऊंड आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं होतं. गुजरात टायटन्सचे बरेचसे सामना नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आले होते. यातले 90टक्के सामने गुजरात टायटन्स जिंकलेही होते. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळण्याचा हार्दिक पांड्याला चांगला अनुभव आहे. कोणत्या वेळी कोणाला गोलंदाजी द्यायची याची माहिती पांड्याला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरद्धच्या रणनितीत हार्दिक पांड्याचा मोठा वाटा असेल.

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टॉसचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे, टॉससाठीदेखील हार्दिक पांड्याचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार कामगिरी करावी लागणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर धावा कशा करायच्या याचाही अनुभव हार्दिक पांड्याला आहे. त्याचबरोबर कोणत्या लाईन-लेंथवर गोलंदाजी करायची याबाबतही हार्दिक पांड्याचा सल्ला महत्त्वाचा ठरणर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये