कसोटीत ऑस्ट्रेलियाने विंडीजला चारली धूळ! मात्र टीम इंडियाचे वाढले टेन्शन, करावी लागणार कसरत…

नवी दिल्ली : (ICC World Test Championship 2023) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीची शर्यत रोमहर्षक बनली आहे. ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला, त्यामुळे सध्या कसोटी सामन्यात कांगारूंचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. संघाने पुढचे काही सामने जिंकले तरी फायनलमध्येही प्रवेश करेल. त्यामुळे टीम इंडियाचे तणाव वाढले आहे. येत्या काळात भारताला विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 75 टक्के विजय गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 60 टक्के विजय गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 53.33 विजयाची टक्केवारी कायम ठेवली आहे. भारताचा संघ 52.08 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे.
सध्या चार संघांमध्ये अंतिम फेरीची शर्यत सुरू आहे. टीम इंडियाला आधी बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत त्यांचा पराभव करावा लागेल. असे झाले तरी, संघाची विजयाची टक्केवारी 70 पेक्षा कमी असेल. परंतु अशा परिस्थितीत भारत विजयाच्या टक्केवारीच्या आधारे दक्षिण आफ्रिका संघाला मागे टाकू शकतो आणि भारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो, परंतु वेळेसाठी काहीही सांगता येत नाही.