“अंबाबाईच्या आशीर्वादानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर…” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली इच्छा

तुळजापूर – Supriya Sule NCP | “राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होऊदे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन” असे वक्तव्य बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रविवारी (दि 29) तुळजापूरच्या दौऱ्यावर असताना मध्यांसमोर केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधान आलेलं दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस 1999 पासून (NCP) अस्तित्वात असून आजवर या पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. 2019 च्या निवडणुकीतही आघाडी स्थापन करून (Mahavikas Aghadi) उपमुख्यमंत्री पदावरच राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं. (Ajit Pawar) आता मात्र राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांची मुख्यमंत्री पदाची आशा वाढलेली दिसत आहे.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर माध्यमांसमोर बोलताना त्या म्हणाल्या, “राज्यभरात दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकत वाढत चालली आहे. मात्र अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. येणाऱ्या निवडणुकांत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री व्हावा. अंबाबाईच्या आशीर्वादानं तसं झालं तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन.” (tulajabhavani)
राज्याला महिला मुख्यमंत्री (women CM for maharashtra) कधी मिळणार विचारल्यानंतर ‘मी काही ज्योतिषी नाही, या प्रश्नाचं उत्तर जनताच त्यांच्या मतांच्या स्वरुपात देईल’ असंही त्या म्हणाल्या. ‘यंदा पाऊस चांगला होऊ दे, शेतमालाला चांगला भाव मिळू दे, आणि महागाई कमी होऊ दे’ अशी प्रार्थना त्यांनी भवानीमातेचं दर्शन घेताना केली.