ताज्या बातम्यारणधुमाळी

गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अमित शाह म्हणाले, “जर भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळाले तर…”

नवी दिल्ली | Gujarat Elections 2022 – गुजरात निवडणुकांचं (Gujarat Assembly Elections) बिगुल वाजलं असून सर्वच पक्ष जोमात तयारीला लागले आहेत. अशातच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. तसंच आता भाजपकडून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी सोमवारी बोलताना सांगितलं की, “पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये पक्षानं बहुमत मिळवल्यास भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.” त्यामुळे भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

“जर भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळालं तर भूपेंद्र पटेल पुढील मुख्यमंत्री असतील”, असं अमित शाह यांनी सीएनएन-न्यूज 18 कार्यक्रमात सांगितलं. तसंच विजय रूपानी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेलांनी सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली होती. पटेल घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले असून यंदा त्यांना पुन्हा त्याच मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये