माझ्या वाटेला जाल तर याद राखा; चित्रा वाघ यांचा चव्हाणांना इशारा

फक्त नाव “विद्या” असून विद्या येत नाही हो… सोलापूर प्रकरणात ना पीडितेला भेटलो, ना आजपर्यंत तिला पाहिलं, पण तुम्हाला मात्र जीभ उचलली की, टाळ्याला लावण्याची घाईच फार… बाकी सुनेला छळणार्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकंच नाही का? पुन्हा नादी लागू नका माझ्या. तोंडावर आपटाल.
- चित्रा वाघ , भाजप प्रदेश उपाध्यक्षा
मुंबई : राज्यात अचानक बंडखोरी होऊन सत्ताबदल झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्काच बसला आहे. त्या ध्हयापेक्षा मोठा हादरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बसत आहे. शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाचीच लढाई आता सुरु झाली आहे. सेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन झाले आहे मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यातच आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाणांवर टीकेची झोड उठवली आहे. पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असा इशाराही वाघ यांनी ट्वीट करत दिला आहे. फक्त नाव विद्या असून विद्या येत नाही हो.. सोलापूर प्रकरणात ना पिडीतेली भेटलो ना आजपर्यंत तिला पाहिले पण तुम्हाला मात्र जीभ उचलली की टाळ्याला लावण्याची घाईचे फार असते.
बाकी सुनेला छळणार्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळे फिकेच नाही का?, त्यामुळे पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असा धमकी वजा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीच्या चव्हाण यांना दिला आहे.भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचीक या विरोधात पीडित तरुणीच्या मागे उभ्या राहिल्या होत्या. तसेच शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिडीत तरुणीच्या पाठी मागे उभ्या राहल्या होत्या. मात्र याप्रकरणात पिडीत तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते. पीडितेसोबत वाघ यांची १८ फेब्रुवारीला भेट झाली त्यानंतर तीने २०१७ पासूनची घटना सांगितली होती. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केला आणि जबरदस्ती तिचा गर्भपात केला.
तो सुद्धा चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन करण्यात आला आहे, अशी माहिती त्या पीडितेने वाघ यांना दिली होती. दरम्यान खासदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्या सुनेला छळण्याचे आरोप झाले होते. विद्या चव्हाण यांची सुन गौरीने चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात छळाची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांवर गुन्हाही दाखल केला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आपली बाजू मांडताना विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. विद्या चव्हाण यांच्या आरोपांना गौरीने उत्तर दिले होते. घरात छळ होत असल्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हाच माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करून बदनामीची धमकी चव्हाण कुटुंबाने दिली होती.