आरोग्यताज्या बातम्या

वाढलेलं पोट फ्लॅट करायचंय, मग ब्रेकफास्टमध्ये करा ‘हे’ पाच गुणकारी बदल

मुंबई | Healthy Lifestyle – प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला असून या धावपळीच्या जगात जगत असताना अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतं. यामुळे काहींना शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. प्रत्येकाच्या घरातील किमान एका व्यक्तीला तरी पोट वाढल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर काही स्त्रिया, पुरुष सतत आपल्या वाढलेल्या पोटामुळे घरातून बाहेर पडायला किंवा फॅन्सी कपडे परिधान करायला संकोचीत होत असतात. यामुळे आज आपण वाढलेलं पोट कमी करण्यासाठी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये कोणते बदल करायचे याबाबत जाणून घेणार आहोत.

अनेकजण पोट फ्लॅट करायचंय म्हंटल की, वाट्टेल ते प्रयत्न करायला तयार असतात. मग यासाठी ब्रेकफास्ट, जेवण, योगा, व्यायम यासारखे अनेक उपाय ट्राय केले जातात. परंतु अनेक वेळा त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही. यासाठी रोज उठल्यानंतर तुम्ही पुढीलप्रमाणे हे गुणकारी उपाय केले पाहिजेत.

हे आहेत पाच गुणकारी उपाय-

1) सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जावे. किमान एक ग्लासतरी पाणी तुम्ही रोज उठल्यावर पिले पाहिजे.

2)तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी चरबीयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते. यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

3) याचप्रमाणे थोडा व्यायाम, योगा करून अर्ध्या तासामध्ये नाष्टा केला पाहिजे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमची पचनशक्ती मंदावते आणि कॅलरी बर्न होणे बंद होत असते.

4)सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा. आणि सकाळी उठल्यानंतर काही न खाता नियमित या पाण्याचं सेवन केले पाहिजे.

5)पोटाची चरबी वाढेल असे पदार्थ खाऊ नये म्हणजेच बेकरी पदार्थ खाणे टाळावे. यापेक्षा रोज मोड आलेले कडधान्य खाणे अतिउत्तम.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये