इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

वर्ल्ड कप संपल्यानंतर स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Imad Wasim Announces Retirement | अलिकडेच भारतात वर्ल्ड कप (World Cup 2023) पार पडला. वर्ल्ड कप संपल्यानंतर आता एका स्टार खेळाडूनं त्याच्या निवृत्तीची (Retirement) घोषण केली आहे. पाकिस्तानचा (Pakistan) स्टार खेळाडू इमाद वसीमनं (Imad Wasim) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इमाद वसीमनं अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानं सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

इमाद वसीमनं वयाच्या 34 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. बराच काळ इमाद हा संघाबाहेर होता, त्यामुळे त्यानं निवृत्तीची घोषणा केल्याचं म्हटलं जातंय. इमादनं त्याच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी निवृत्तीचा विचार करत होतो. तर आता ही निवृत्तीची योग्य वेळ आहे.

इमाद वसीमनं ट्विट करत म्हटलं आहे की, मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत खूप विचार करत होतो आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची ही योग्य वेळ आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघानं नव्या प्रशिक्षकाच्या आगमनानं भविष्यात चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे.

मी संघाची चमकदार कामगिरी पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसंच मी माझ्या कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार मानतो ज्यांनी मला सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यास मदत केली, असंही इमादनं म्हटलं आहे.

दरम्यान, इमादनं आत्तापर्यंत 55 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. तर या वर्षी त्यानं एप्रिल महिन्यात शेवटचा सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इमादच्या नावावर 5 अर्धशतकं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये