दैनिक राष्ट्रसंचारच्या वृत्तानंतर एसटी प्रशासनाला जाग; शिक्रापुर एसटी स्थानकात शौचालयाचे काम सुरु
शिक्रापूर | शिरुर येथील एस टी स्थानकात सध्या पुणे नगर महामार्गावरील येणारी जाणारी जास्तीत जास्त वाहने एस टी स्थाकात येत असल्यामुळे अनेक प्रवाशी येथून प्रवास करत असताना ऐन उन्हाळ्यात येथे प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नसून शौचालय देखील नसल्याने प्रवाशांसह महिलांची कुचंबना होत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असताना याबाबत मात्र आगार प्रमुख व आगार व्यवस्थापक एकमेकांसह नागरिकांकडे बोट करत असल्याने येथील एस टी स्थानक असून अडचण नसून खोळंबा या आशयाचे वृत्त दैनिक राष्ट्रसंचारने प्रसिद्ध केले होते, सदर वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग खडबडून जागे झाले असून एस टी स्थानक परिसरात पाण्याची टाकी तसेच शौचालयाचे काम सुरु करण्यात आले आहे. तर याबाबत नागरिक व प्रवाशी देखील समाधान व्यक्त करत आहे.
शिरुर येथील एस टी स्थानकात ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी तसेच शौचालय नसल्याने याबाबत दैनिक राष्ट्रसंचारने आवाज उठवताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग खडबडून जागे झाले असून एस टी स्थानक परिसरात पाण्याची टाकी तसेच शौचालयाचे काम सुरु करण्यात आले आहे.