ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

विरोधी पक्षाच्या अभिनंदन ठरावात मुख्यमंत्र्यांकडून वडेट्टीवारांचं कौतुक, ठाकरेंना कानपिचक्या; म्हणाले…

मुंबई | Maharashtra Assembly Session 2023 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी वडेट्टीवारांचं कौतुक देखील केलं. सभागृहाला एक चांगला विरोधी पक्षनेता लाभल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विदर्भाचे नेते विरोधी पक्षनेते झाल्याचं म्हणत विदर्भाचंही कौतुक केलं. यावेळी ते म्हणाले की, आमचे उपमुख्यमंत्री देखील विदर्भाचे आहेत. त्यामुळे पाहुणचारामध्ये विदर्भ हे सर्वोत्तम आहे. तसंच आता सभागृहालाही एक चांगला विरोधीपक्ष नेता लाभला आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. विजय वडेट्टीवर हे वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. ते रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहेत. तसंच रस्त्यावर उतरून काम करायला हिंमत लागते. आम्हीही तेच केलं आहे. कारण संकट आल्यावर न लपता त्या संकटाला सामोरं जायचं असतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये