पिंपरी-चिंचवड भागात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (दि. २४) सहा ठिकाणी झाडे पडली असून सुदैवाने यात कोणी जखमी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, BVG कॉर्नर, निगडी येथेसुद्धा वृक्ष पडला असून कोणतीही जिवितहानी झाल्याचे समजते. मात्र त्याठिकाणी 4 गाड्याचे नुकसान झाल्याचे कळते. पिंपरी-चिंचवड मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती धंनजय भालेकर यांची गाडीसुद्धा निगडीत झाड पडल्यामुळे अडकली असून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे कळते.
BVG कॉर्नर, निगडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी,अग्निशामक दल आणि पोलीससुद्धा पोहोचले असून युद्धपातळीवर त्याठिकाणी रस्त्यावर झाडे काढण्याचे काम सुरु आहे.
तसेच,आज सुदर्शनचौक, पिंपळे गुरव येथे सकाळी सव्वा सात वाजता मुसळधार पावसामुळे झाड पडले. त्यानंतर साडेसात वाजता औंध जिल्हा रुग्णालय परिसरात एक झाड पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास टाटा मोटर्स चिंचवड येथे कंपनीच्या गेट समोरील झाड पडले. त्यानंतर सव्वा अकरा वाजता मोरे पाटील चौक कुदळवाडी चिखली आणि 12 वाजता बिर्ला हॉस्पिटल जवळ चिंचवड गाव येथे झाड पडले. एक वाजताच्या सुमारास थेरगाव येथे एका सोसायटीमध्ये झाड पडल्याची घटना घडली.झिरो बॉईज चौक, अजमेरा पिंपरी येथे एका सोसायटीची भिंत कोसळली. या भिंतीखाली तसेच झाड पडीच्या घटनांमध्ये अनेक वाहने अडकली. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.