IND vs AUS अंतिम सामन्यादरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन व्यक्ती मैदानात घुसला, नेमकं काय घडलं?
IND vs AUS : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला होता. सुरुवातीच्या धक्क्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहली क्रीजवर आहे. डावाच्या 14व्या षटकात एका चाहत्याने प्रवेश केला आणि या वेळी माऊच थांबला. हा विराट कोहलाचा चाहता होता जो क्रिजवर आला आणि त्याने विराटला मिठी मारायला सुरुवात केली.
या घटनेनंतर विराट कोहली आणि या चाहत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या चाहत्याच्या हातात पॅलेस्टाईनचा ध्वजही होता आणि त्याच्या टी-शर्टच्या मागच्या बाजूला फ्री पॅलेस्टाईनही लिहिलेलं होतं.
ही व्यक्ती मैदानात आल्यावर विराट आणि राहुलने त्याला ढकलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी येऊन या व्यक्तीला मैदातुन बाहेर काढले.