क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

IND vs AUS : स्टेडियम प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, कोटींचं बिल थकवल्याने सामन्याआधीच बत्ती गुल!

रायपूर : (IND vs AUS T20 Series 4th Match) भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा टी-२० सामना आज रायपुरच्या मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना सुरु होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सामन्याच्या काही तासांपुर्वीच स्टेडियमचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. थकित वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्टेडियम प्रशासनाचा गलथान कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आहे.

दरम्यान, रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी एक अडथळा निर्माण झाला आहे. सामना सुरु होण्याच्या काही तासांपुर्वीच स्टेडियमची बत्ती गुल करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षांपासून स्टेडियम प्रशासनाने वीज बिल थकवलं आहे. या बिलची रक्कम आता ३.१६ कोटींवर जाऊन पोहोचली आहे.

वीच बिल न भरल्याने ५ वर्षांपूर्वी स्टेडियमचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनने विनंती केल्यानंतर स्टेडियमसाठी तात्पुरता कनेक्शन स्थापित करण्यात आलं आहे. त्यामुळे सामना काही तासांवर असताना यांसारख्या घटना म्हणजे दुर्दैवी बाब आहे. शेवटी म्हणतात ना ‘अंत भला तो सब भला’.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये