कंगारूंच्या फिरकीपटूचा कहर! केवळ 109 धावांवर टीम इंडियाची शरणागती!

इंदूर : (Ind Vs Aus Test Series 2023) मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून मालिकेतील तिसरी कसोटी इंदूरच्या अहिल्यादेवी होळकर मैदानावर खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताला सुरुवातीपासून एकापाठोपाठ धक्के बसत गेले. पहिल्या दिवशी जेवणाच्या वेळेपर्यंत कंगारूंनी भारताचं संपूर्ण कंबरड मोडलं होत. केवळ 84 धावांवर 7 बाद अशी दैनिय व्यवस्था करून ठेवली होती.

मॅथ्यू कुहनमनने भारतीय सलामीवीर रोहित शर्मा रोहित शर्मा, शुभमन गिल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांना बाद केले. मॅथ्यूने श्रेयस अय्यरला बाद करून भारताला 5वा धक्का दिला. विराट कोहलीने काही काळ एक टोक राखले पण टॉड मर्फीने त्याला पॅव्हेलियनमध्ये एलबीडब्ल्यू करून पाठवले. कोहलीने 52 चेंडूत 22 धावा केल्या.

डावाच्या 25व्या षटकात भारताला सातवा धक्का बसला. श्रीकर भरत 30 चेंडूत 17 धावांची खेळी करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. लिऑनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भरतने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. रविचंद्रन आश्विनला 3 धावांवर तर उमेश यादव 17 धावांवर बाद झाला. अक्सर पटेल 12 धावा आणि मोहम्मद सिराजला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारताच्या संपूर्ण संघाने केवळ 109 धावांवर कंगारूंसमोर शरणागती पत्कारली. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन 5 आणि नॅथन लायन 3 तर तोड मुर्फी 1 विकेट घेतली.
