कांगारूंकडून भारताचा 209 धावांनी दारुन पराभव! WTC ऑस्ट्रेलियाच्या नावे; टीम इंडियाची निराशा

लंडन : (IND vs AUS, WTC Final 2023) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलेय. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी दारून पराभव केला. दुसऱ्या डावात 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 234 धाावंवर आटोपला.
टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण विराट कोहली, रविंद्र जडेजा अन् अजिक्य राहाणे यांच्या एकपाठोपाठ विकेट्स पडल्या या धक्यातून बाहेर निघायच्या आत कांगारूंना 234 धावांवर भारताचा खेळ आटोपला आणि जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
भारतीय संघाचा 10 वर्षांपासून आयसीसी चषक विजायाचा दुष्काल कायम राहिलाय. आज अनेक क्रीडा प्रेमींचे स्वप्नही भंगले. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर आणखी एक आयसीसी ट्रॉफीची नोंद झालीय. रोहित शर्मा 43, चेतेश्वर पुजारा 27, विराट कोहली 49 आणि अजिंक्य रहाणे 46 यांनी चुकीचा फटका मारत आपल्या विकेट गमावल्या. नॅथन लायनने याने चार, स्कॉट बोलँडने तीन, तर पॅट कमिन्सने एक तर स्टार्कने 2 गडी बाद करत भारतीय फलंदाजीचा फडशा पाडला.