मोठी बातमी! चौथ्या दिवशीची सुरुवात कांगारूंवर भारी; सेट फलंदाज उमेश यादवने पाठवला माघारी..

लंडन : (IND vs AUS, WTC Final 2023) जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे.
दरम्यान, चौथ्या दिवशीच्या सुरुवातील भारतीय गोलंदाज उमेश यादवने सेट फलंदाज मार्नस लाबुशेन 41 धावावर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे क्रिकेटप्रेमीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या मैदानावर कॅमरुन ग्रीन 25 धावांवर तर अलेक्स कैरी 21 धावांवर नाबाद खेळत आहेत. सध्या कांगारुंनी 167 धावांची मजल मारली असून 340 धावांची आघाडी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला मोहम्मद सिराजने खिंडार पाडले. डेविड वॉर्नर याला अवघ्या एका धावेवर तंबूत पाठवले. त्यानंतर उमेश यादव याने उस्मान ख्वाजा याला 13 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. 24 धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन गडी तंबूत परतले होते. पण त्यानंतर स्मिथ आणि लाबूशेन या जोडीने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. अर्धशतकी भागिदारी करत टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. पण रविंद्र जाडेजा याने स्मिथला 34 धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर धोकादायक ट्रेविस हेड 18 धावांवर जाडेजाच्या गोलंदाजीवरच बाद झाला.