रोहित विना खेळणाऱ्या भारतीय संघाचा दणदणीत विजय, इशान-कोहलीची तुफान खेळी!

चितगाव : (Ind Vs Ban ODI Sereas 3rd Match) इशान किशनच्या आक्रमक द्विशतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात बांगलादेशपुढे ४१० धावांचे आव्हान ठेवलं होतं. त्याचा आव्हानाचा पाठलाग करताना मात्र बांगलादेशला १८२ धावाच करता आल्या. त्यामुळं भारताला या सामन्यात २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. भारताचा हा सर्वाधिक धावांनी मिळवलेला तिसरा विजय आहे.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून, आलेल्या इशानने आज मिळालेल्या संधीचे अखेर सोने केले. इशान किशनने या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्याने यजमान संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाली केली आणि २१० धावांची तुफानी खेळी केली.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन दिवशीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताचा युवा सलामीवीर ईशान किशननं मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद 200 धावा करणारा तो फलंदाज असून इशान किशन हा भारताच्या आजच्या विजयाचा नायक ठरला.